भविष्यकथन
भविष्याची चिंता मानवाला प्राचीन काळापासून सतावत आली आहे. त्यावर मात करण्यासाठी काळाच्या ओघात भविष्यकथनाच्या विविध पद्धतींनी आकार घेतला. या सर्वांचा उगम पुराणकाळात झाल्याचे दिसून येते. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारा आदिमानव जसजसा निसर्गबदलांशी परिचित होऊ लागला तसतसा निसर्गाच्या अफाट सामर्थ्यात स्वतःला जुळवून घेण्यास शिकला. हे शिकत असताना निसर्गाच्या वर्तमान स्थितीतून अथवा बदलातून भविष्यातील सृष्टी आकार घेत …